महत्वाची सूचना १० जाने. २०२१
तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड चा वापर करून कोणीही अन्य व्यक्ती लॉगिन करणार नाही याची काळजी घेणे हि तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी पुढील गोष्टी करा
१) नेहमी एकाच डिव्हाईस (मोबाईल / टॅबलेट / लॅपटॉप) चा वापर करा. (त्यामुळे आमची सिस्टीम ते डिव्हाईस ओळखू शकते) गरज पडली तर अन्य डिव्हाईस मधून लॉगिन करा. अश्यावेळी तुमचा जुना डिव्हाईस सिस्टीम रेकॉर्ड मधून काढून नवीन डिव्हाईस टाकला जातो.
२) नियमित पणे लेक्चर पहा. किंवा प्रश्न सोडावा. किंवा फोरम डिस्कशन मध्ये सामील व्हा. (त्यामुळे तुमची आणि तुमच्या डिव्हाईस ची माहिती अद्ययावत होते. )
३) तुमचा मित्र किंवा मैत्रीण किंवा अन्य कोणालाही यांना युजरनेम आणि देऊ नका. (यातून तुमचे महत्वाचे डिटेल्स लीक होण्याची शक्यता असते. आणि ती व्यक्ती तुमच्या नावाने फोरम मध्ये काहीही पोस्ट देखील करू शकते. त्यांच्यासाठी हा IPC कलमं ५००, ५०७ आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चॅप्टर ११ नुसार गुन्हा होईल. आणि तुमचा सुरक्षेसाठी आम्ही त्यांच्यावर कार्यवाही देखील करू. पण तुम्ही त्या आधीच काळजी घ्या)
४) तुमचा पासवर्ड नियमितपणे बदला.
तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व डिव्हाइसेस ची माहिती (आय पी ऍड्रेस , डिव्हाईस चे मॉडेल, IMEI नंबर, डिव्हाईस च्या मालकाची ओळख इत्यादी) सरकारी नियमानुसार रेकॉर्ड करीत असतो. आणि नियमितपणे ती प्रशासनाने सांगितलेल्या पोर्टल वर सादर देखील करतो.
आपली वेबसाईट पूर्णपणे एन्क्रिप्टेड आहे त्यामुळे तुमच्या सुरक्षेत आम्ही कोणतीही कसूर सोडलेली नाही.